तुळजापूर ( सतिश राठोड ) :-
ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता साखर कारखानदारांच्या विरोधात तुळजापुरात सहा नोव्हेंबर रोजी बेमुदत उपोषण करणार असून याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत.
सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदारानी 2025 26 चालू गळीत हंगामातील ऊसाची पहिली उचल प्रति टनास तिन हजार रूपये देण्यात यावी, 2023 24 मधील मातोश्री साखर कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची ऊस बिल प्रति टन 2700 रूपये प्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावेत यासह मागणी करिता शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे व जिल्हा संघटक सुरज बचाटे यांनी पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन 6 नोव्हेंबर 2025 रोजी तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. आंदोलन संदर्भात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती करत आहेत. होणाऱ्या आंदोलनास उमरगा तालुक्यातील डिग्गी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवणार असल्याचे अश्वाशीत केले. यावेळी शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे व सुरज बचाटे यांनी बोलताना म्हणाले की,जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काचे उस बिलाची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असून होणाऱ्या आंदोलनात सहभाग नोंदवा असे आवाहन देखील बोलताना केले. धाराशिव जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,लातूर जिल्ह्यातील साखर कारखानदार यांनी चालू गळीत हंगाम ऊसाचे दर प्रति टन 3150 रुपये जाहीर केलेला आहे त्याच प्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदाराने देखील 3150 रुपये प्रति टन उसाचे दर जाहीर करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. उमरगा तालुक्यातील डिग्गी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी डीग्गी येथे आयोजित शेतकरी बैठकीत आम्हाला न्याय मिळवून द्या अशी भावना शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासमोर केली.



                                    
