धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील वैद्यकीय प्रवेश पात्र परीक्षा (NEET) उत्तीर्ण होऊन बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्याचा मान मिळविल्याबद्दल कुमारी सुप्रिया विनोद गंगणे व कुमारी पूजा संतोष वाघमारे या दोन विद्यार्थिनींचा ग्रामपंचायत जळकोट यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गावातील या दोन्ही कन्यांनी आपापल्या कुटुंबाचे, तसेच संपूर्ण जळकोट गावाचे नाव उज्वल केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विद्यार्थिनींनी ग्रामीण भागातून यशाचा मान मिळवत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. यावेळी कार्यक्रमाला सरपंच गजेंद्र पाटील,
उपसरपंच प्रशांत नवगिरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल छत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेश कदम, शिवसेना (उ.बा.ठा) तालुका संघटक कृष्णात मोरे, सदाशिव हासुरे, हनुमंत सुरवसे, माजी उपसरपंच बंकट बेडगे, राम जाधव, संतोष वाघमारे, विनोद गंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.




