धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पार्वती कन्या प्रशालेचे सहशिक्षक श्री. पंडित पाटील सर यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांची उच्च शिक्षणासाठी जर्मनी देशात निवड झाल्याबद्दल जळकोट ग्रामपंचायत च्या वतीने दिनांक 31- 10 -2025 रोजी मानाचा फेटा, शाल, पुष्प हा व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी गावचे सरपंच गजेंद्र कदम, माजी सरपंच अशोक भाऊ कदम, प्रकाश चव्हाण,कृष्णात मोरे, ग्रामपंचायत सदस्य महेश कदम, बसवराज कवठे, पंढरीनाथ कदम,बाळासाहेब कदम, अभिमन्यू कदम सर, पिंटू कारले, चंद्रकांत स्वामी सर, डी.डी .कदम सर, शंकर कदम, दत्तात्रय चुंगे, अमोल आलुरे, ब्रह्मानंद कदम व तसे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




