धाराशिव प्रतिनिधी ( सतीश राठोड ) –
पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था उस्मानाबाद संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतच पार पडली असून दोन पॅनल मध्ये समोरा समोर लढत झाली या लढतील विरोधी पॅनलच्या उमेदवाराच्या चारी मुंड्या चित्त करून पाटबंधारे प्रगती विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन करून पतसंस्थेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे .
उस्मानाबाद जिल्हा पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था उस्मानाबाद संचालक मंडळाची दोन मार्च रोजी 11 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीचा नुकतच निकाल जाहीर झाला . पाटबंधारे प्रगती विकास पॅनलचे डावरे अंबादास , हाजगुडे धनंजय, वाघ बाळासाहेब , गोरे प्रकाश, पेरके नरेंद्र, माने सायली, जळकोटकर शशिकला , भालेकर दत्तात्रय , गणेश अनंत असे एकुण 9 उमेदवार विजयी होताच प्रगती विकास पॅनलच्या संचालकाने गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष करून विजयी उमेदवारांचा सिंचन कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भारती साहेब जिल्हा सचिव कुलकर्णी यांनी सन्मान केला. तर विरोधी पॅनलचे वाघ रमेश , डोंगरे विनोद हे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. प्रगती विकास पॅनल च्या उमेदवारांचे विजय खेचून आणण्यासाठी पॅनल प्रमुख धनंजय हाजगुडे यांनी परिश्रम घेतले .प्रगती विकास पॅनलने पतसंस्थेच्या माध्यमातून सभासद कर्जाची मर्यादा दहा लाख , सभासद पाल्यांचे शैक्षणिक कर्ज व सवलती देणार , सभासदांची विमा पॉलिसी काढणार वैद्यकीय कारणास्तव तातडी कर्ज मंजूर करणार यासह अन्य सभासदासाठी सुविधा देण्याचे जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे . उस्मानाबाद जिल्हा पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था उस्मानाबाद पंचवार्षिक निवडणुकीत पाटबंधारे प्रगती विकास पॅनलच्या विजयी उमेदवाराने सभासदांच्या सोयी सुविधा करीता आता काय प्रयत्न करणार हे पाहवं लागणार आहे .