spot_img
16.1 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग व जळकोट मंडळात अतिवृष्टी झाली असून,शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रु तात्काळ मदत द्या – मनसे मागणी

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

नळदुर्ग व जळकोट महसूल मंडळात सरासरी पेक्षा अधिक पाऊस होऊन अतिवृष्टी झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पाण्यात गेला आहे. सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून,प्रशासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नळदुर्ग विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शिरीष डुकरे, रवी राठोड आदीच्या स्वाक्षरी आहेत.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या