spot_img
27.3 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

वनराईचे चांगले नंदनवन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक

आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्ह्याची नोंद
महाराष्ट्रातील पहिला मान धाराशिव जिल्ह्याला
वृक्ष दिंडी काढीत केली वृक्ष लागवड

धाराशिव प्रतिनिधी :- (दि.१९ जुलै )

हरित धाराशिव अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील २३४ ग्रामपंचायती,१३ नगरपालिका व ३ नगर पंचायती या ठिकाणी एक पेड मॉं के नाम वृक्ष लागवड करीत १५ लाख वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हीमध्ये रेकॉर्ड मिळविले आहे. लावलेले वृक्ष जगविण्यासाठी प्रशासनाबरोबर जनतेने जगविण्यासाठी काळजी घेतली तर धाराशिव जिल्हा निसर्गरम्य निश्चित होईल.विशेष म्हणजे या जिल्ह्याला निसर्ग सौंदर्य लाभलेले असून वनराईला अतिशय चांगले विकसित केले तर आसपासच्या जिल्ह्यातील लोकसुद्धा हे पर्यटन पाहण्यासाठी येतील.त्यामुळेच जिल्ह्यातील वनराईचे चांगले नंदनवन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आज १९ जुलै रोजी केले.

दरम्यान,हा विक्रम करण्याचा मान धाराशिव जिल्ह्याच्या कपाळावर साकारला ही जिल्हावासियासाठी अभिमान व गौरवास्पद अविस्मरणीय कामगिरी ठरली आहे.

धाराशिव तालुक्यातील शिंगोली शिवारात वन विभागाच्या पाच हेक्टर क्षेत्रावर एक पेड माँ के नाम,जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून हरित धाराशिव अभियान १५ लक्ष वृक्ष लागवडीचा शुभारंभ पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आला.त्यावेळी पालकमंत्री सरनाईक बोलत होते.यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास घाडगे- पाटील,सिने अभिनेते स्वप्नील जोशी,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना,छत्रपती संभाजीनगरचे वनसंरक्षक प्रमोदचंद लाखरा,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी वन व्ही.के.करे,प्रादेशिक विभागीय वन अधिकारी बी.ए.पोळ आदीची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री सरनाईक पुढे म्हणाले की,धाराशिव जिल्ह्याचे वनराई क्षेत्र करण्यासाठी अपेक्षित असेल तेवढा निधी उभारू व हा प्रकल्प यशस्वीपणे साकारून तसेच हिंगोली येथील वनराईसाठी बारा मीटरचा रस्ता करावा अशा सूचना देत ते म्हणाले की,जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढवून ते विकसित करण्यासाठी २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला तरी तो करु.वनक्षेत्र वाढविण्यासाठी कार्यक्रम राबवावा लागेल असे त्यांनी सांगितले.

लावलेली झाडे कशी टिकतील यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे श्री.सरनाईक त्यांनी आवर्जून नमूद केले.लावलेली झाडे जगविण्याची मी जबाबदारी घेतो,मी जेव्हा जिल्ह्यात येईल तेव्हा ती झाडे आहेत की नाही यासाठी भेट देऊन त्या झाडांची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच जिल्ह्याला राज्य व देश पातळीवर न्यायचे असेल तर सर्वच पक्षांनी एकत्रित येत वृक्ष लागवडीचे काम केले तर गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची निश्चितपणे नोंद होईल असे त्यांनी सांगितले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने ४० लाख वृक्षांची लागवड करायची असून उर्वरित २५ लाख वृक्ष लागवड करून आज स्थापित केलेले रेकॉर्ड मोडून काढीत जागतिक स्तरावर नवीन रेकॉर्ड करावे असे आवाहन श्री.सरनाईक यांनी केले.
तसेच आमदार कैलास पाटील यांनी शेत रस्त्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की,त्यांच्या सुचनेचा निश्चितपणे जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करून मोजणीच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाने योग्य तोडगा काढून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना त्यांनी केल्या.
जिल्हा प्रशासनाबरोबर जिल्हावासियांनी देखील प्रयत्न करावेत,असे आवाहन करीत हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी जिल्हाधिकारी पुजार यांचे कौतुक केले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की,आज आपण वृक्ष लागवडीचा जिल्ह्यामध्ये विक्रम घडवित आहोत.ही झाडे आपल्याला लावून चालणार नाही तर ती जगविण्यासाठी लोकप्रतिनिधी व सर्व नागरिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.एका व्यापक अभियानाचा भाग म्हणून आपण काम करीत आहोत.विशेष म्हणजे झाडे जगविणे ही सर्वांची जबाबदारी ही आपल्या कृतीमधून दाखवून द्यावी असे त्यांनी नमूद केले.तर शेत रस्त्यासाठी सर्व्हेच्या बाबतीत अडचणी येत असून प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून मोजणी करून त्या माध्यमातून शेत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आवाहन त्यांनी केले.त्याबरोबरच शिंगोली,घाटंग्री वृक्ष लागवडीसाठी ३०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येणार आहे.तसेच येडशी अभयारण्य परिसरात जिप्सी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले

आ कैलास पाटील म्हणाले की,झाडे लावणे अवघड नाही ती जगविले अवघड आहे.झाडे किती जगतात ते महत्त्वाचे आहे.लोकांनी आपली जबाबदारी म्हणून वृक्ष संवर्धन करण्यासाठी झोकून दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.तसेच शेत रस्त्यासाठी महसूलचा आदेश असला तरी रस्ता देण्यासाठी जमीन मोजणीची अडचण येत आहे.त्यामुळे भूमी अभिलेख आठ अधिकारीपैकी सहा पदे रिक्त आहेत ती भरावीत.शेत रस्त्याची जमीन मोजून देण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी सिने अभिनेते स्वप्निल जोशी यांनीही आपले विचार व्यक्त केले.
प्रस्ताविक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी केले.सूत्रसंचालन क्षीप्रा मानकर यांनी व उपस्थितांचे आभार वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी व्ही.के.करे यांनी मानले.

प्रारंभी वृक्षदिंडी काढण्यात आली.तर कोनशिलेचे उद्घाटन व वृक्ष लागवड केल्यानंतर मुख्य कार्यक्रम स्थळी संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी विद्यार्थी, शिक्षक,अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*श्री.पुजार व डॉ.घोष यांचा दोन मेडल्सने सन्मान*
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी १५ लाख वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व नागरिकांना सोबत घेऊन गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्न केले.त्या प्रयत्नास यश आले असून या वृक्ष लागवडीने विक्रम केला आहे.याची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्ह्याची नोंद झाली आहे.त्याबद्दल या एजन्सीचे संजय भोला यांनी दिले. ती दोन्ही प्रमाणपत्र व मेडल्सने पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पुजार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ घोष यांना सन्मानित करण्यात आले.

 

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या