spot_img
18.7 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

खुदावाडीत अवकाळी पावसाने पपई पिकाचे नुकसान अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले

 

धाराशिव ( सतीश राठोड ) :-

सध्या अवकाळी पावसाचे तांडव सुरू आहे या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे या अवकाळी पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील भीमाशंकर कबाडे सह येथील अनेक शेतकऱ्यांचे पपई पिकाचे मोठे नुकसान झाले आहे .
पपई पिकाचे उत्पन्न चांगले येईल या आशेने भीमाशंकर कबाडे सह अनेक शेतकऱ्यांनी पपई पिकाची लागवड केली.लागवड केल्यापासून खत औषध सह एकरी जवळपास एक लाख रूपये खर्च केले. अवकाळी पावसामुळे लागवड खर्च निघणे कठीण होऊन बसले आहे . खुदावाडीत भीमाशंकर कबाडे सह अन्य शेतकऱ्याची एकून जवळपास पंधरा ते वीस एकर पपई लागवड केली आहेत सतत पावसाचे पाणी लागून राहील्याने पपई पिकास मोठा फटका बसला आहे. भीमाशंकर कबाडे या शेतकऱ्यांचे चार एकरचा पपई बाग अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडला आहे यामुळे लागवड खर्च निघणे कठीण होऊन बसले आहे या पावसामुळे शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे या अवकाळी संकटामुळे पपई ची लागवड केलेल्या आनेक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे तरी शासनाने सदर शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या