मुरूम प्रतिनिधी (ता.१०) :-
येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील सण १९८१-८२ च्या बॅचचा स्नेह मेळावा तब्बल ४३ वर्षांनी तांदुळवाडी येथे उत्साहाने पार पडला. तुझं कसं चाललयं..सध्या काय करते..मुलं काय करतात..प्रकृतीची काळजी..ख्यालीखुशाली विचारण्यापासून अगं,कुठे असते तू?. किती वर्षांनी भेटतो.?सगळे कसे आहेत? अशा आपुलकीच्या प्रश्नांपर्यंतचे संवाद.शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा देत मैत्रीनी एकत्रित आल्या
निमित्त होते हुरडापार्टीचे, ज्युनिअर सौ.सुरेखा घैसास राजपूत यांच्या पुढाकाराने ४३ वर्षांनंतर एकत्र आणण्याचे व गेटटुगेदर घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला.
कित्येक वर्षांनी मैत्रिणी एकत्र आल्या आणि गप्पा रंगल्या, विविध खेळाचा आनंद लुटला, उखाणे घेण्यात आले. गेटटुगेदर ला प्रामुख्याने.सौ.सुनंदा घैसास पवार, सौ.जगदेवी भोसगे हंगरगे,प्रेमलता मुंदडा जाजू,सौ.आशा टेकाळे यादव, सौ.मंगल सरदेशमुख खामगावकर, सौ.जयश्री मुदकण्णा भळकरी, सौ.हिरा राजपूत ठाकूर,सौ.राजश्री जोशी कांबळे,सुशीला बोळशेट्टे वारद,सौ.जयश्री पाटील पवार,सौ.चंद्रकला मुदकण्णा शेरीकर,सौ.सुरेखा मंगरूळे बेस्टे सौ.जयश्री मुदकण्णा ,सौ.राजश्री जोशी कांबळे,सौ.उज्ज्वला पाटील दिघे,सौ.विजया पाटील व्हट्टे, सौ.जयश्री मुदकण्णा आदीची स्नेह मेळावा साठी उपस्थिती होती.
शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत. शालेय खेळ खेळत,.गप्पागोष्टी,हितगुज करत दिवस कसा गेला समजले नाही . परतीची वेळ आली तसा कंठ दाटून आला.परत कधी भेटायचे?प्रश्न विचारत,एकमेकींना भेटवस्तू देऊन. परतच्या भेटीची आश्वासन देत गळाभेट घेत अश्रूंना आवर घालत. निरोप घेण्यात आला.
“दाहीदिशांनी एकत्र येत
थरथरत्या आठवणीं
ओठावर ठेवत
असंख्य पक्षी घरट्याकडे
उडत गेली”