धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
आयटीआयमध्ये विश्वकर्मा कारागिरांच्या उपस्थितीत अभ्यासक्रमांची सुरुवात
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून कामगारांचा सन्मान
राज्यातील ७५,००० प्रशिक्षणार्थींना मिळणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण
मुंबई, दि. ८ ऑक्टोबर :
देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते मंगळवार ८ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन*करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एकाच वेळी राज्यातल्या ५६० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये विश्वकर्मा कारागिरांच्या उपस्थितीत अत्याधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे,अशी माहिती कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे दिली.
कामगार हा समाजाचा अविभाज्य घटक असून या घटकाचा सन्मान झाला पाहिजे हा विचार आदरणीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्रभाई मोदीजी यांनी दिला असून याच अनुषंगाने कामगारांचा सन्मान करण्यात येत असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. एकीकडे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या शुभहस्ते नवी मुंबईत ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या महत्वकांक्षी उपक्रमाचे उदघाटन होत असतानाच राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये विश्वकर्मांच्या हस्ते अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याचेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.
…… धाराशिव. जिल्ह्यातील भाई उद्धवराव पाटील शासकीय ……. आयटीआय संस्थेत विश्वकर्मा . श्री नानासाहेब काळे…… यांच्या हस्ते सहा…. अल्पमुदत अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात विश्वकर्मा अर्थात कामगार वर्गाचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. सुदृढ आणि सौहार्दपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी कामगारांना सन्मानाचे स्थान मिळायला हवे प्रधानमंत्री मोदीजींचा हाच विचार आम्ही या निमित्ताने पुढे घेऊन जात असल्याचेही मंत्री लोढा यांनी नमूद केले आहे.याच संकल्पनेतून स्थानिक आयटीआयच्या या कार्यक्रमात कामगारांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून चालू वर्षात ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, पुढील वर्षापासून ही संख्या १ लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प कौशल्य विभागाने केला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग व्यवस्थापन समित्या (IMC) स्थानिक पातळीवर हे अभ्यासक्रम चालविणार आहेत. त्यामुळे शिक्षणाचे नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रण या सर्व बाबींमध्ये स्थानिक सहभाग व उत्तरदायित्व वाढणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत भाई उद्धवराव पाटील शासकीय आयटीआय धाराशिव येथे आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमांचा समावेश असून यात इलेक्ट्रिक डोमेस्टिक सोलुशन, बॅटरी सिस्टीम रिपेअर टेक्निशियन, डिजिटल मित्र , टू व्हीलर सर्विस टेक्निशियन, ब्युटी थेरपीस्ट, योगा ट्रेनर इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन “वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट” हा विशेष अभ्यासक्रमही राबविण्यात येईल.
या अल्पमुदत अभ्यासक्रमांसाठी इच्छुक तरुणांनी अधिक माहितीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने केले आहे.



                                    
