spot_img
19.5 C
New York
Saturday, September 13, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

धाराशिव शहरातील सराईत घरफोड्याकरणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड करुन सोने मिळवून दिल्याने फिार्यादीने अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आभार मानले

धाराशिव प्रतिनिधी :-

अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. शफकत आमना(अतिरिक्त पदभार पोलीस अधिक्षक) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोह/327 जानराव, पोह/1003 वाघमारे, पोह/1479 जाधवर, पोना/1611 जाधवर, चालक पोह/1248 अरब, पोअं/बोईनवाड, पोअं/693 दहीहांडे असे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता आयकर युनिट चे सपोनि सुधीर कराळे, पोउपनि चंद्रकांत सावंत, पोह/ मनोज जगताप, यांचे तांत्रीक विश्लेषनावरुन व पथकाने गुप्त बातमीदारा मार्फत काढुन पोलीस ठाणे धाराशिव शहर गुरनं 346/2025 कलम 331(4),305 भा.न्या.सं. हा गुन्हा आरोपी नामे- परसु लक्ष्मण चव्हाण रा. जुना बसडेपो पाठीमागे, पारधी पिढी धाराशिव याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने आम्ही गुप्तबातमीदार मार्फत नमुद आरोपीची माहिती काढुन त्याचा शोध घेत असताना तो शिवाजी चौकात आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने तेथे जावून त्याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास तृयास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा चुलता दत्ता बाबु चव्हाण असे दोघांनी मिळून केला असल्याचे सांगीतले त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात सोन्याचे दागिने मिळुन आले त्याचेकडे त्याबाबत विचारपुस केली असता त्याने ते सोन्याचे दागिने सदर गुन्ह्यातील असल्याचे सांगीतले व पैशाची गरज असल्याने मी ते दागीने विकण्यासाठी घेवून आलो होतो असे सांगीतले. आरोपीच्या ताब्यातुन दोन तोळे आठ ग्रॅम(28(ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 2,52,000₹किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन कार्यवाही कामी मुद्देमालासह आरोपीस पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे हजर केले आहे.नमुद गुन्ह्यातील फिर्यादी नामे- आजीमोद्दीन उमराव शेख यांना काही नागरिक म्हाणाले की, गरीबाचे झालेली चोरी उघडकीस येत नाही. पोलीस त्यांचे गुन्ह्याचा तपास करत नाही. अशी त्यांची मानसिकता झाली होती. त्यांना काही लोकांनी देखील सांगीतले होते. पंरतु त्यांचा चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणल्याने त्यांचा गैरसमज दुर झाल्याने फिर्यादी यांनी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आभार व्यक्त केले.

सदरची कामगिरी अपर पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत आमना (अतिरिक्त पदभार पोलीस अधिक्षक) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार,सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके,आयकर युनिट चे सपोनि सुधीर कराळे, पोउपनि चंद्रकांत सावंत, पोलीस हवालदार विनोद जानराव,समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, पोह/मनोज जगताप, चालक पोह/ महेबुब अरब, पोअं/ प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे यांचे पथकाने केली आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या