spot_img
2.9 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

वैचारिक, मूल्यात्मक, गुणात्मक, संस्कारक्षम शिक्षण मुलांना दिले पाहिजे – विश्वनाथअण्णा तोडकर

कळंब / प्रतिनिधी :-

वैचारिक, मूल्यात्मक, गुणात्मक, संस्कारक्षम शिक्षण मुलांना दिले पाहिजे आम्ही शिक्षणाच्या वैचारिक भूमिकेत जोडलो आहोत, स्पर्धा माणसाला प्रोत्साहन देते, बक्षीस विध्यार्थ्याला प्रोत्साहन देते त्यामुळे स्पर्धा हे माध्यम आहे, पुढे जाण्याची उर्मी जागे करण्याचे काम विविध स्पर्धेच्या माध्यमातून पर्याय संस्था करणार आहे, असे प्रतिपादन पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथअण्णा तोडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दि. २७ मार्च रोजी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. या बाबतचे सविस्तर वृत्त असे आहे कि, पर्याय सामाजिक संस्था, सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट आणि आनिक फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. ली. यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. ५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलभूषण शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कळंब आणि वाशी तालुक्यातील ४७ गावातील ६० प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटामध्ये “रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावरती निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्याच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन पर्याय संस्था प्रशिक्षण सभागृह हासेगाव के. येथे दि. २७ मार्च रोजी करण्यात आले होते, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पर्याय चे अध्यक्ष सुभाष तगारे, कळंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पंढरीनाथ मगर, पदमश्री शंकर बापू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्याक परमेश्वर पालकर, राजेंद्र बिक्कड, संतोष भोजने, चंद्रकांत शिंदे, अनिताताई तोडकर, आणिक फायनान्स चे मोहीम प्रमुख विलास गोडगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
शाहीर बंडू खराटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर पोवाडा गायन करून कार्यक्रमास रंगत आणली, तसेच मोनिका मोरे दसमेगाव (झीन्नर) या मुलीने अतिशय उकृष्ठ भाषणातून आपले विचार व्यक्त केले, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्याय संस्थेचे समन्वयक आश्रुबा गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन तेजश्री भालेराव यांनी केले, पर्याय चे अध्यक्ष श्री. सुभाष तगारे, आणिक फायनान्स चे मोहीम प्रमुख विलास गोडगे, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, परमेश्वर पालकर, प्रशांत निन्हाळ, पांडुरंग शिंदे, चंद्रकांत शिंदे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्याय परिवारातील श्रीमती सुनंदा खराटे, बालाजी शेंडगे, भिकाजी जाधव, विकास कुदळे, वैभव शिंदे, वैभव चोंदे, कल्पना जतकर, दर्शन जोगी, अशोक शिंदे, दिगंबर लडके, माया लडके, अशा तोडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या