spot_img
1 C
New York
Sunday, January 18, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची चाळण ऐंशी लाखाचा निधी मिळनुही रस्ता कामाला मुहूर्त मिळेना!

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर – बिभीषण मिटकरी चिवरी धाराशिव

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. नळदुर्ग – तुळजापूर रोडवरील चिवरी पाटी ते महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या झालेल्या या दुरावस्थेमुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

या रस्त्या संदर्भात वारंवार वृत्तसंस्थेने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता, अखेर या वृत्ताची दखल घेऊन संबंधित लोक प्रतिनिधीनी संबंधित विभागाला रस्ता दुरुस्तीची मागणी करून निधी मंजूर उपलब्ध केला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या आराखड्यातून या रस्त्यासाठी ऐंशी लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र पुढील प्रशासकीय प्रक्रिया होण्यास विलंब होत असल्यामुळे काम रखडले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी उन्हाळ्याची अवघे दोन महिने शिल्लक आहेत त्यामुळे हा रस्ता तातडीने होणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदा तरी या रस्ता दुरुस्तीला मुहूर्त मिळणार का? असं सवाल ग्रामस्थातून उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या