धाराशिव (सतीश राठोड ) :-
तुळजापूर तालुक्यातील शिवाजीनगर तांडा खडकी येथील झेडपी शाळेचे सहशिक्षक नवनाथ गायकवाड व प्रताप माळी यांची प्रशासकीय बदली झाली या दोन्ही आवडत्या शिक्षकांची बदली झाल्याने येथील ग्रामस्थांच्या वतीने जंगी सन्मान तर शालेय विद्यार्थाकडून पुष्पृष्टी करून निरोप देण्यात आला.
हे दोन्ही शिक्षक विद्यार्थी प्रिय होते.अनेक विद्यार्थ्यांना त्यानीं घडविले. बंधुभाव एकता आपलेपणाची भावना प्रत्येकाविषयी प्रेम,भेदभाव न करने या बाबी त्यानी विद्यार्थ्यांना शिकविले. त्यांच्या सहवासात अनेक विद्यार्थी घडले विद्यार्थ्याप्रती त्यांची चांगली आत्मियता होती. गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच त्पुढाकार होता. शाळेतील विविध उपक्रम त्यांनी राबविले. प्रताप माळी सर यानी ११ वर्ष सेवा बजावली तर नवनाथ गायकवाड सर यानी ८ वर्ष सेवा बजावली या दोन्ही शिक्षकांनी येथे अध्यापनाचे चांगले कार्य केले.त्याच्या एकंदरीत कार्याची दखल घेऊन ग्रामस्थ व शालेय कमिटीच्या वतिने या दोन्ही शिक्षकांच्या जंगी सन्मान करीत शालेय विद्यार्थ्याकडून पुष्पवृष्टी करून निरोप देण्यात आला. याप्रसंगी खडकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल झापा राठोड, शालेय कमिटी अध्यक्ष राजू गुराप्पा राठोड, झापू राठोड, हिंदू राष्ट्र सेना उपशहर प्रमुख लिंबाजी जाधव, बाबूलाल चव्हाण नागेश राठोड,बंडू चव्हाण,सुभाष राठोड, देविदास राठोड,मिथुन राठोड, चंद्रकांत चव्हाण,फुलसिंग राठोड,अमित चव्हाण,अनिल चव्हाण,शिवाजी राठोड,सुरेश राठोड, सह कमिटीचे उपाध्यक्ष सर्व संचालक ग्राम विद्यार्थी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



                                    
