spot_img
10.6 C
New York
Wednesday, November 5, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

येणेगूर कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा

येणेगूर / प्रतिनिधी :-

उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे आज दिनांक.12/4/2025 वार.शनिवार रोजी प्रशालेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था येणेगूर यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रशालेत सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आले.या कार्यक्रमासाठी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य राहुल बनसोडे,सचिव दिलीप गायकवाड,प्रशालेचे मुख्याध्यापक महेश हरके,श्री परमहंस शिक्षण संस्थेचे संचालक.शंकर हुळमजगे,कोमल कीर्तने यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सामान्य ज्ञान स्पर्धेत 7वी ते12वी पर्यंतचे 104 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्कृती विभाग प्रमुख गोपाळ गेडाम यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक महेश खंडाळकर,अविनाश दुनगे, व्यंकट बिराजदार,प्रवीण स्वामी,चंद्रकांत बिराजदार, पार्वती जगताप,कालिंदी भाले,सुरेश जाधव,महादेव बिराजदार,सौरभ उटगे,अप्पू मुदकण्णा,राजेंद्र जाधव, अमोगसिध्द अण्चे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या