spot_img
18.7 C
New York
Saturday, August 2, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील अवैध धंदे बंद करा, ग्रामपंचायतचे पोलीस प्रशासनाला निवेदन

 

चिवरी प्रतिनिधी :- ( बिभीषण मिटकरी )

तुळजापूर ​​​​​तालुक्यातील चिवरी गावात सुरु असलेली दारूविक्री आणि इतर अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतने आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासनाकडे साकडे घालण्यात आले आहे.यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर, नळदुर्ग पोलीस स्टेशन यांना रितसर निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात असे नमूद केले आहे की, मौजे चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात व गावात अनेक ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री व गावठी दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे व लहान मुलावर विपरीत परिणाम होत आहेत तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरात दारू विक्रीमुळे भाविकांना त्रास होत आहे. व गावठी दारूमुळे गावातील तरुण मृत्युमुखी पडले आहेत व अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. तरी मंदिर परिसरातील व गावातील असलेले सर्व अवैध धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावे अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मागील अनेक वर्षापासून गावात अवैध धंदे सुरु असल्याने गावातील वातावरण खराब होऊन महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान कोणतीही मोठी घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे पोलिस प्रशासन अवैध धंदे व्यवसायिकांवर कोणती ठोस कारवाई करणार याकडे ग्रामस्थाचे लक्ष लागले आहे.

 

 

चिवरी गावामध्ये मागील अनेक दिवसापासून राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. अनेक तरुण मुले दारूच्या आहारी गेल्यामुळे व्यसनाधीनता वाढली आहे, तर दारूमुळे अनेकांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत. मंदिर परिसरातही दारू विक्रीमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस खात्याने कडक कारवाई करून अवैध व्यवसायाला आळा घालावा.

संदीप शिंदे तंटामुक्ती उपाध्यक्ष चिवरी.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या