spot_img
15.4 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

गुढीपाडवा पट वाढवा या अभियाना अंतर्गत शिक्षकांच्या घरोघरी प्रत्यक्ष भेटी

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर : विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशाला येथील इयत्ता पाचवी व आठवी प्रवेशासाठी प्रत्यक्ष विद्यार्थांच्या घरी जाऊन प्रवेश फॉर्म भरण्यात येत आहे. *गुढीपाडवा पट वाढवा* या अभियानांतर्गत प्रत्यक्ष गृहभेटी घेणे सुरू आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेमध्ये पुढील सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मोफत शिक्षण, स्वतंत्र वर्ग खोल्या, अत्यावश्यक भौतिक सुविधा, सुसज्ज संगणक कक्ष , प्रशस्त प्रयोगशाळा, विविध पुस्तकाचा संग्रह असणारे सुसज्ज ग्रंथालय , Interactive Panel Board, स्मार्ट टीव्ही, खेळाचे भव्य मैदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुला मुलींना स्वतंत्र शौचालय, खेळाचे विविध साहित्य, शासकीय विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना, दररोज रुचकर शालेय पोषण आहार, मोफत गणवेश सॉक्स बुट, स्पर्धा परीक्षेची तयारी,चित्रकला परीक्षा, मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅड, तज्ञ शिक्षक वर्ग, सांस्कृतिक व विविध गुणदर्शन स्पर्धेची तयारी, अशा सर्व सोयी सुविधा त्याच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक सर्व बाबी शाळेमध्ये उपलब्ध आहे. तरी इयत्ता पाचवी ते दहावीसाठी शैक्षणिक वर्ष 2025-2026 वर्षासाठी चालू आहे तरी पाल कांनी आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा अशी विनंती शाळा प्रशासन आणि शिक्षकवृद करत आहेत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत मुख्याध्यापक प्रदीप तर मोडे, शाळेचे शिक्षक संतोष सारणे पुष्प लता कांबळे जयराम शिंदे समाधान पवार शाळेला सहकार्य वृत्तीने करणाऱ्या वैष्णवी कदम, आरती सुरवसे, क्लार्क गोपाळ बंदपट्टे शिपाई प्रमिला स्वामी हे सर्वजण पासून कार्य करत आहेत
करीत आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या