spot_img
13 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग दि ५ (प्रतीनिधी) नळदुर्ग अणदूर जळकोट व परिसरातील अनेक गावांतील नागरिकांच्या सोयी करता नळदुर्ग या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. अपेक्षित तालुका नळदुर्ग अणदूर जळकोट व परिसरातील अनेक गावातील नागरिकांना तालुकास्तरीय कामासाठी तुळजापूर या ठिकाणी जावे लागत असे. जळकोट महसूल मंडळ आणि नळदुर्ग महसूल मंडळ यांच्या अखत्यारित येणाऱ्या तलाठी कार्यालयातील संदर्भित कामासाठी आता तुळजापूर या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. अप्पर तहसीलदार अभिजीत जगताप यांनी नळदुर्ग येथे तलाठी व कोतवाल यांची संयुक्त बैठक घेऊन ही माहिती दिली आहे. सध्या या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत पुढे चालून या कार्यालयासाठी दोन ते तीन पदांना कायमची मंजुरी असून नियमित वेतनश्रेणीवर वाढीव पदे मंजूर करण्याची विनंती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वरील महसूल मंडळातील वेगवेगळ्या कार्यालयीन कामकाजासाठी प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने या भागातील नागरिकांना आता तुळजापुरला न जाता वेळ खर्चाची बचत होऊन फायदा होणार आहे अशी माहिती तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी दिली आहे. तसेच आता कोणत्याही महसूल प्रमाणपत्र दाखले व इत्यादी कामांसाठी तुळजापूर या ठिकाणी न जाता नळदुर्ग येथील अप्पर कार्यालयाचा फायदा घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

नळदुर्ग दि ५ (प्रतीनिधी)

नळदुर्ग अणदूर जळकोट व परिसरातील अनेक गावांतील नागरिकांच्या सोयी करता नळदुर्ग या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले आहे.

अपेक्षित तालुका नळदुर्ग अणदूर जळकोट व परिसरातील अनेक गावातील नागरिकांना तालुकास्तरीय कामासाठी तुळजापूर या ठिकाणी जावे लागत असे.

जळकोट महसूल मंडळ आणि नळदुर्ग महसूल मंडळ यांच्या अखत्यारित येणाऱ्या तलाठी कार्यालयातील संदर्भित कामासाठी आता तुळजापूर या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही.

अप्पर तहसीलदार अभिजीत जगताप यांनी नळदुर्ग येथे तलाठी व कोतवाल यांची संयुक्त बैठक घेऊन ही माहिती दिली आहे.
सध्या या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत पुढे चालून या कार्यालयासाठी दोन ते तीन पदांना कायमची मंजुरी असून नियमित वेतनश्रेणीवर वाढीव पदे मंजूर करण्याची विनंती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

वरील महसूल मंडळातील वेगवेगळ्या कार्यालयीन कामकाजासाठी प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने या भागातील नागरिकांना आता तुळजापुरला न जाता वेळ खर्चाची बचत होऊन फायदा होणार आहे अशी माहिती तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी दिली आहे.

तसेच आता कोणत्याही महसूल प्रमाणपत्र दाखले व इत्यादी कामांसाठी तुळजापूर या ठिकाणी न जाता नळदुर्ग येथील अप्पर कार्यालयाचा फायदा घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या