spot_img
13 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

कै. माधवराव (काका) पाटील यांची ९९ वी जयंती विविध ठिकाणी साजरी…..  

मुरुम प्रतिनीधी :-

ग्रामीण भागातील गोरगरीब, होतकरु मुला-मुलींना शिक्षणाची सोय व्हावी या उद्येशाने शैक्षणिक संकुलन उभे करणारे, शेती उद्योगाला चालना देण्याकरिता विठ्ठलसाई साखर कारखान्याची उभारणी करणारे विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कै. माधवराव (काका) पाटील यांची ९९ वी जयंती मुरुम शहरात विविध ठिकाणी रविवारी (ता. ६) रोजी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी कै. माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी भाजपचे नेते बसवराज पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव, बबनराव बनसोडे, रशिद शेख आदिंची प्रमुख उपस्थिती होती. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कै. माधवराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास भाजपचे नेते बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन अँड. व्ही. एस. आळंगे, कारखान्याचे संचालक ॲड. संजय बिराजदार, श्रमजीवी संस्थेचे संचालक मल्लीनाथ दंडगे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसने, श्रीकांत बेंडकाळे, उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार, तात्यासाहेब शिंदे, उल्हास घुरेघुरे, राजशेखर कोरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल व नूतन विद्यालय, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना आदी ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या