spot_img
15.4 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

अनिता मुरकुटे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

धाराशिव / प्रतिनिधी :-
  उमरगा पंचायत समिती याच्या वतिने गटशिक्षण कार्यालय आयोजित  आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 -25 चा दिला जाणारा पुरस्कार नाईचाकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती अनिता मुरकुटे बाबुराव उर्फ अनिता संतोष केंद्रे यांना पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाईचाकूर येथे कार्यरत असलेले शिक्षिका श्रीमती मुरकुटे अनिता बाबुराव अनिता संतोष केंद्रे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आले सदर कार्यक्रम श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे करण्यात आले . यावेळी सन्माननीय उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण जी स्वामी बाबा पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पवार , गटविकास अधिकारी मरोळ साहेब , गटशिक्षण अधिकारी सन्माननीय जीवनरावजी पडवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती मुरकुटे अनिता यांना स्मृतिचिन्ह देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला . त्यांच्या या आदर्श शिक्षक पुरस्कारामुळे अनिता मॅडम यांना उमरगा लोहारा सह जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे .
- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या