spot_img
15.4 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

संजीवनी मेडिकल, नळदुर्ग व 8-फार्मा ग्रुप अणदूर यांच्या वतीने युवा नेते सुनील (मालक) चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोई चे उद्घाटन

 

अणदूर / प्रतिनिधी :-

तुळजापूर तालुक्याचे भाग्यविधाते, युवा नेते सुनील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी मेडिकल, नळदुर्ग व 8-फार्मा ग्रुप अणदूर यांच्या वतीने थंडगार जार च्या पाणपोई चे उद्घाटन निमा संघटनेचे सचिव डॉ. जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जेष्ठ पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे, मारुती खारवे,उमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
गेली 10 वर्षांपासून ही पाणपोई सुनील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी काढण्यात येते, 30 मार्च ते 15 मे पर्यंत ही पाणपोई लोकांसाठी उपलब्ध आहे,रुग्ण व ग्रामस्थांना असल्या भीषण उन्हाळ्यात थंडगार पाणी पाजण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार अजय अणदूरकर यांनी केले तर आभार ऋषभ जाधव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी 8-फार्मा ग्रुप चे जीवन मोजगे, संजय जाधव, गोविंद शिंदे, गुणवंत मुळे, सचिन कासार, तेजस जाधव, प्रतीक किलजे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या