spot_img
20 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

श्री केदालिंगेश्वर देवस्थान यात्रा मोठ्या उत्साहात साजरी

 

धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश झालेल्या ग्रामदैवत श्री केदालिंगेश्वर देवालय ची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमाने गुढीपाडव्या दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. जळकोट येथील ग्रामदैवत श्री. केदार लिंगेश्वर देवालयाची यात्रा ही सालाबादप्रमाणे गुढीपाडव्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . यात शनिवार दिनांक २९ रोजी सायंकाळी सात वाजता मंदिर दीपोत्सवाची ज्योत पेटवण्यात आली. त्यामुळे मंदिर व परिसर दिव्याच्या उजेडाने आकर्षित दिसत होता. यामध्ये गावातील महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. त्याच्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. व दिनांक ३० रोजी गुढीपाडव्याच्या पहाटे श्री केदार लिंगेश्वराला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्री शिवाय नमोस्तुभ्य, ओम नमः शिवाय अशा मंत्र घोषात आवाजात श्री केदारलिंगेश्वराची पालखी मिरवणूक वाजत गाजत नंदीकोलसह गावातून हलगीच्या कडकडात व राजर्षी शाहू कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जळकोट व श्री कुलस्वामिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाचे नृत्य मोठ्या उत्साहात सादर करण्यात आले. यावेळी शाळेतील महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. व तसेच या मिरवणुकीमध्ये पूरवंत यांनी ही आपला भारदार असा खेळ चौका चौकामध्ये सादर केला. या पालखी मिरवणुकीची सुरुवात बसवेश्वर चौकातून करण्यात आली व तसेच पुढे शिवाजी चौक, संभाजीनगर, शिवनेरी गल्ली मार्ग गावातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर अग्नी प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर श्री केदा लिंगेश्वर मंदिरात सार्वजनिक पूजा व धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या धर्मसभेत नंदगाव विरक्त मठाचे मठाधिपती श्री .श्री .श्री. शत राजशेखर महास्वामीजी यांच्या हस्ते गावातील दानशूर व्यक्ती, विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार शाल, केदार लिंगेश्वराची प्रतिमा, व बुके देऊन करण्यात आला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी केदार लिंगेश्वर यात्रा कमिटी व देवस्थान ट्रस्ट यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज किलजे यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या