मुरूम प्रतिनिधी ( ता.१०) :-
क्रांतिसूर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त प्रतिवर्षी बसव प्रतिष्ठान अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार” देऊन राज्ययील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,फेटा असे पुरस्कार स्वरूप आहे. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२५ निमित्त यंदाचा पुरस्कार सोहळाच ०९ वे वर्ष असून आतापर्यंत राज्यातील २४० व्यक्तींना संघटनेचा माध्यमातून सन्मानित करण्यात आला आहे. पुरस्काराने सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ऊर्जा मिळावी ही उदात्त हेतू सामोरे ठेऊन बसव प्रतिष्ठानच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरूम येथे या सोहळ्याचे आयोजन केले जाते, सण २०२५ या वर्षात ३० एप्रिल रोजी म्हणजेच अक्षय तृतीया रोजी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा संपन्न होणार आहे, त्यानंतर मे २०२५ महिन्यात “राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार” सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यात सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, पत्रकार,क्रीडा,विधिज्ञ,शेतकरी, उद्योग,व्यापार,सहकार,संगीत,नृत्य,प्रशासकीय यासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान गौरव सोहळा संपन्न होणार आहे व त्याच बरोबर ०५ व्यक्तींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीने sasmramlingp@gmail.com किंवा www.basavpratishthanrp.com किंवा ७७७४८४९५७२ या व्हाट्सएप नंबर वर दि.०५ मे २०२५ पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे अवहान बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.रामलिंग पुराणे यांनी केले आहे.