spot_img
9.7 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सायकलवरून केली धाराशिव शहराची पाहणी

 

शहर कायम स्वच्छ ठेवण्याचे दिले निर्देश

धाराशिव प्रतिनिधी :-

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता धाराशिव शहराची सायकलवरून पाहणी केली.शहर स्वच्छ,सुंदर व अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त अजित डोके,उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार आदी अधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथून सायकलस्वारी सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,महात्मा फुले चौक, विसर्जन विहीर,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाहणी केली.
शहरातील तुळजापूर-छत्रपती संभाजीनगर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाली व पेवर ब्लॉक बसवण्याच्या प्रस्तावासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.तसेच,शासकीय कार्यालय परिसरात लावलेले जाहिरात फलक तातडीने हटवण्यात यावे असे सांगितले.
नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांचा विकास करून त्या ठिकाणी वाचनालय आणि व्यायामशाळा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली व त्यादृष्टीने नियोजन करण्याचे सांगितले.शहर स्वच्छ आणि सुशोभित राहावे यासाठी नगरपालिकेसह नागरिकांनीही प्रयत्न करावेत,असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील शहरी भागातील स्वच्छता आणि अतिक्रमणमुक्तबाबत जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी पुढील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावण्याच्या सूचनाही श्री.डोके यांना दिल्या.
या पाहणी दरम्यान धाराशिव नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता प्रदीप स्वामी, स्थापत्य अभियंता वैजनाथ द्रुकर, नगररचना सहायक मनोज कल्लुरे,तसेच रोहन जाधव,संग्राम भापकर,विक्रम घोलकर,प्रकाश पवार,अशोक फरताडे आणि गिरीजाराम महेर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या