धाराशिव प्रतिनिधी :-
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा २०२५ चा आदर्श नारी जीवन गौरव पुरस्कार बालकल्याण समितीच्या सदस्या ॲड मैना भोसले, ॲड सुजाता माळी, ॲड दिपाली जहागिरदार व बाल न्याय मंडळाच्या सदस्या ॲड वैशाली धावणे यांना जाहीर झाला आहे
ॲड मैना भोसले, ॲड सुजाता माळी, ॲड दिपाली जहागिरदार व ॲड वैशाली धावणे या बालकांच्या संदर्भात व विधी संघर्ष ग्रस्त बालकांसाठी काळजी आणि संरक्षण,व पुनर्वसनाठी, त्यांच्या व्यक्तिमत्व विकास व गुणवत्ता वाढीसाठी काम करीत आहेत, त्यामुळे संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना २०२५ चा जिल्हा स्तरीय आदर्श नारी पुरस्कार जाहीर केला आहे
हा पुरस्कार सोहळा तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील आपलं घर बालगृह येथे संपन्न होणार आहे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजवादी नेते भाई पन्नालाल सुराणा हे आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला बालविकास अधिकारी किशोरजी गोरे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने,केशेगाव येथील उद्योजीका अंबिका गावडे,बाल न्याय मंडळाचे सदस्य प्रा डॉ अश्रुबा कदम यांची उपस्थिती राहणार आहे,याच दरम्यान अणदूर येथील स्वरलता कराओके क्लबच्या वतीने अनाथ मुलांच्या मनोरंजनासाठी संगीत मैफिल संपन्न होणार असल्याचे संत तुकाराम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दयानंद काळुंके यांनी कळविले आहे