spot_img
5.9 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

तुळजापूरच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. इनामदार मॅडम यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न

तुळजापूर / प्रतिनिधी :- ( उमाजी गायकवाड काटी)

तुळजापूर तालूक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. मेहरुनिसा इनामदार मॅडम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ तुळजाभवानी पुजारी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अगोदर तालूक्यातील गुणवंत शिक्षक श्री पी. के. राठोड व ज्येष्ठ नेते अशोकभाऊ मगर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायट धाराशिव चे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे होते.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्राचार्य जटनुरे, एस सी ई आर टी चे सहसंचालक डॉ. इब्राहिम नदाफ, प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. अर्जून जाधव, शिक्षक नेते लालासाहेब मगर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अर्जून जाधव साहेब यांनी केले.
यावेळी एस सी ई आर टी चे सहसंचालक श्री नदाफ यांनी श्रीम. इनामदार यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी शिक्षक नेते मा. बशीरभाई तांबोळी व बेताळे सर यांचीही समयोचित भाषणे झाली.
आपल्या सत्काराला उत्तर देताना गटशिक्षणाधिकारी श्रीम. इनामदार मॅडम म्हणाल्या की, तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व केंद्रप्रमुख, कार्यालयीन स्टाफ व सर्व शिक्षक संघटनांनी सहकार्य केल्यामुळे मी या तालूक्यात भरीव कार्य करु शकले.. तालूक्यातील शाळांची गुणवत्ता तसेच सलग तीन वर्षे सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये तालूका प्रथमस्थानी ठेवू शकले. वरिष्ठ कार्यालयातील सर्व वरिष्ठांनी वेळोवेळी सहकार्य केले.त्या सर्वांचे आभार मानले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य जटनुरे यांनी एक महिला अधिकारी एवढया मोठ्या तालूक्याचा कारभार किती सक्षमपणे सांभाळू शकतात हे सिद्ध केले. सर्व शासकीय कामकाज तथा सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन आपला तालूका प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न केला. त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नेते लालासाहेब मगर यांनी केले तर आभारप्रदर्शन केंद्रप्रमुख संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. तानाजी महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन भोसले, राहूल जाधव लालासाहेब मगर यांनी कष्ट घेतले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या