धाराशिव / प्रतिनिधी :-
धाराशिव तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथील ग्रामविकास अधिकारी रामलिंग कदम यांची बदली झाल्यानिमित्त त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला. तर नव्याने रुजू झालेले ग्रामविकास अधिकारी अनंत सोनटक्के यांचे सत्कार करून स्वागत करण्यात आले. श्री कदम यांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कार्य केले असून ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्याशी योग्य समन्वय राखून त्यांनी आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला.
सारोळा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी म्हणून रामलिंग कदम हे गत तीन वर्षापासून कार्यरत होते. श्री कदम यांच्याकडे सारोळ्यासह गावसुद येथील पदभार होता. श्री कदम यांनी आपल्या कार्यकाळात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्याशी योग्य समन्वय साधून उल्लेखनीय कार्य केले. विविध योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचून त्याचा लाभ मिळवून दिला. श्री कदम यांनी कामकाज करताना कधीही कोणाची कसल्याही प्रकारची अडवणूक केली नाहीच शिवाय सर्वांना सोबत घेऊन कारभार चालविला. विशेष म्हणजे ग्रामसभा असो किंवा इतर कार्यक्रम. यामध्ये त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन विकास कामात मोलाची भूमिका बजावली. ग्रामविकास अधिकारी रामलिंग कदम यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अनंत सोनटक्के यांची नेमणूक गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी केली आहे. याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी (दि.२८) युवा नेते नितीन चंदणे, उपसरपंच वैभव पाटील व मा. ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी श्री कदम यांना सत्कार करून निरोप दिला. तर नव्याने रुजू झालेले ग्रामविकास अधिकारी अनंत सोनटक्के यांचे सत्कार करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य महावीर काकडे, लिपिक पांडुरंग रणदिवे, कर्मचारी शैलेश शिंदे, अभिजित झोंबाडे यांची उपस्थिती होती.