spot_img
9.7 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

संविधानामुळेच देशाचे अखंडत्व टिकून आहे- डॉ. दत्ताहारी होनराव [श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न]

 

(मुरुम प्रतिनीधी ता.२८)

फाळणीचा इतिहास लक्षात घेता या देशातील भाषिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक विविधता लक्षात घेऊन घटनाकारांनी प्रबळ केंद्र सरकार असणारे संघराज्य निर्माण केले, राज्यांना अधिकाराच्या बाबतीत स्वायत्तता दिली नाही. तसेच या देशातील कोणत्याही घटकराज्याला फुटून बाहेर पडण्याचा अधिकार दिला नाही अशा एकात्मक संघराज्यामुळेच या देशाचे अखंडत्व टिकून आहे असे मत प्रा. डॉ.
दत्ताहरी होनराव यांनी व्यक्त केले. ते काल श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भारतीय संविधान आणि मराठी साहित्य या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले.

येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मराठी आणि मानवी हक्क विभागाच्या वतीने संविधान गौरव महोत्सव आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात दत्ताहरी होनराव यांनी भारतीय संविधानाची 75 वर्षे या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी देशातील वर्तमान राजकीय संस्कृतीवर ताशेरे ओढले. केंद्र-राज्य यांच्यातील वाढत्या तणावावरही त्यांनी भाष्य केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. रत्नाकर बेडगे यांनी मराठी कवितेतील संविधानिक मूल्ये या विषयावर मार्गदर्शन करताना साठोत्तरी कवितेतून स्वातंत्र्य, समता, बंधुता, यासारख्या मूल्यांना कवींनी आपल्या कवितेतून समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे. कविता ही समाज प्रबोधनाचेच एक साधन आहे. अनेक कवितांमधून सामाजिक न्यायाचा संदेश दिला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात खुली चर्चा करण्यात आली. या सत्रात प्रा. किरण सगर, डॉ. दत्ताहरी होनराव, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. पद्माकर पिटले यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मार्गदर्शन केले गेले.
संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शहरातील पत्रकारांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी दै. पुढारीचे पत्रकार शंकर बिराजदार, दिव्य मराठीचे अंबादास जाधव, गो.ल. कांबळे आणि नारायण गोस्वामी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी संविधान गौरव महोत्सवाच्या निमित्ताने घेतलेल्या निबंध, वक्तृत्व, पोस्टर प्रदर्शन आणि सामान्य ज्ञान स्पर्धांचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. निबंध स्पर्धेत घोडके साक्षी, गायकवाड पूजा, पवार सौंदर्य, सगर आरती यांनी पारितोषिक मिळविले. पोस्टर स्पर्धेत पवार सौंदर्य, शेंडगे वैभवी, कांबळे वैष्णवी, पटेल मेहताब, जमादार पंकज यांनी पारितोषिक मिळविले. सामान्य ज्ञान स्पर्धेत गायकवाड अनिरुद्ध, पाटील सौरभ, माने निकिता, तांबोळी उमादेवी यांनी पारितोषिक मिळविले तर वक्तृत्व स्पर्धेत पटेल मेहताब, शिंदे सिद्धिविनायक, संध्या जगताप, गंगोत्री चिंचोळे यांनी पारितोषिक मिळविले. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य विलास इंगळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पद्माकर पिटले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गिरीधर सोमवंशी यांनी केले तर मानवी हक्क विभागाचे समन्वयक डॉ. डी. बी. ढोबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या