धाराशिव न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर जळकोट येथे राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या संशोधनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. प्रतिमापूजानानंतर विद्यार्थ्यांना मनोरंजनातून विज्ञान शिकता यावे यासाठी विज्ञानकोडे घेण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांमधील शोधक वृत्तीला चालना मिळावी यासाठी लिटल सायंटिस्ट ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे साहित्य आणि प्रयोग याचे सादरीकरण केले. त्यानंतर सायन्स पोस्टर या स्पर्धेचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन कुंभार व उपाध्यक्ष श्री.शकीलभाई मुलाणी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी अनेक विज्ञानातील संकल्पना व अनेक महान शास्त्रज्ञ यांचे जीवनचरित्र पोस्टरच्या माध्यमातून सादर केले. त्यानंतर वैज्ञानिक रांगोळी ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक वैज्ञानिक रांगोळ्या रेखाटल्या. हृदय, पाणी वाचवा पृथ्वी वाचवा, चांद्रयान मोहीम राशीचक्र या रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. दुपार सत्रामध्ये जिज्ञासा विज्ञान स्पर्धा परीक्षा ही विज्ञानावर आधारित परीक्षा घेण्यात आली. या सर्व स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पारितोषक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जळकोट बीट चे विस्तार अधिकारी मा. जट्टे साहेब व होर्टी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. महाबोले साहेब यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका एम. बी.महामुनी, एम. एस.रेणुके, एन. एन. इटकरी, एस. जी. अभिवंत, डी. एस. वनवे, जी. के. मुरमुरे, एम. एम. चव्हाण, विज्ञान शिक्षक डी. एम. कुडकले, एम. आर. आहेरकर, श्रीकांत कदम, आकांक्षा लोखंडे या सर्वांनी प्रयत्न केले.