spot_img
9.7 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

बसवराज पाटील यांच्या हस्ते बसवराज पेट्रोलियमचे उद्घाटन…

मुरूम, ता. २५ (प्रतिनिधी) : –

देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी तरुणांनी नवनवीन व्यवसायाकडे वळले पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या प्रगती बरोबरच देशाची ही प्रगती होते. सध्या पेट्रोल, डिझेल हे अत्यावश्यक झाल्याचे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी केले. मुरूम ता. उमरगा येथे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे बसवराज पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे उद्घाटन बसवराज पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, सोलापूरचे सीनियर सेल्स मॅनेजर शाश्वत शर्मा, संस्कार गुप्ता, लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती विश्वनाथ पत्रिके, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, सचिन राजनाळे, विश्वनाथ मुदकण्णा, अंकुश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, मुरूम हे शहर राष्ट्रीय महामार्गालगत आहे. त्यामुळे येथे दुचाकी, चार चाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या व्यवसायामुळे इथल्या ग्राहकांची सेवाच होणार आहे. हा व्यवसाय करताना आपण त्यात शुद्धता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. या भागात शेतकरी वर्ग मोठा असून शेतीतील बरीचशी कामे यंत्राद्वारे, ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही एक प्रकारे मदत या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून होईल. पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, डॉ. नितीन डागा, शरणाप्पा मंगरूळे, श्रीशैल मंगरूळे, अजय औसेकर, प्राचार्य अशोक सपाटे, दत्ता चटगे, राजशेखर मुदकण्णा, संतोष चटगे आदि उपस्थित होते. किरण बरबडे, ओमकार पाटील, नाना बेंडकाळे, गणेश काबरा, गणेश अंबर, गुरु स्वामी, शरण बेळमगे, महेश पाटील, श्रीहरी पाटील, महादेव मेणसे व बरबडे परिवारातील सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज बरबडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार शितल राजनाळे यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या