तुळजापूर / प्रतिनिधी :-
तुळजापूर तालुक्यातील बेकायदेशीर वीट भट्टी सुरू असून सदर वीट भट्टीत चालकास संबंधित प्रशासन अभय देत असून अनेक वेळेस निवेदन देऊन ही विशेष म्हणजे अर्ध नग्न आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी दिनांक २५ मंगळवार रोजी दुपारी तुळजापूर तहसील कार्यालय तहसीलदार यांच्या दालनात ज्वलंत पदार्थ घेऊन प्रवेश केला यावेळेस तहसीलदार हे आपल्या खुर्चीवर बसले होते त्यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी ज्वलंत पदार्थ अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस पोलिसांनी मध्यस्थी करून पदाधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळेस भ्रष्टाचार निर्मूलनचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांनी बेकायदेशीर असलेल्या वीट भट्टी कारवाई करावी असा आदेश देऊनही तालुक्यातील कार्यालय काहीच ॲक्शन घेत नाही यामुळे आमच्यावर आत्मदहन करण्याची वेळ आली आहे. असे वाटते की हे दोन नंबर धंदेवाल्यांना खतपाणी घालत आहेत असा आरोप यावेळेस गणेश पाटील यांनी केला.