अनदूर / प्रतिनिधी :-
स्वैराचार आणि स्वातंत्र्य घरातून विनाअट मिळणार सपोर्ट यामुळे स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा आपण घेतला कशाच्या बळावर? हे बाळकडू कसे प्राप्त झाले? या प्रश्नाला उत्तर देताना मुंबईच्या सिने अभिनेत्री सिमरन खेडकर म्हणाल्या की ,जीवनात संघर्ष, स्पर्धा असेल तर खूप काही शिकता येतं .आपल्यातले स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखून यशाच्या आकाशात उंच भरारी घेता येतं. घरात मिळालेल्या स्वातंत्र्याला स्वैराचार समजून वागल्यास आपण दिशाहीन होतो .यशापासून कोसो दूर राहतो. आईने माझ्यावर केलेले संस्कार मला जीवनात उपयोगी पडले. कला, क्रीडा ,कथाकथन, नाट्य, वाचन, वादविवाद, हार्मोनियम, संगीत याचे बाळकडू मला मिळाले, छोट्या बायो ची मोठी स्वप्न ,वेल डन भाई, लॉकडाऊन 20-20 ,कोलंबस, अशोक मामा ,रुबाब यामध्ये मला मनापासून काम करता आले. आपणही करू शकता. तरुणाईला कानमंत्र देताना त्या म्हणाल्या, तरुणपणी चालक व्हा. सोयी प्राप्त करून घ्या. मोबाईल आणि कलर टीव्ही म्हणजे संसार नाही. जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अणदूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाले .या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या सिने अभिनेत्री सिमरन खेडकर उपस्थित राहून विद्यार्थी त्यांच्या शुभहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र दादा आलुरे ,श्रीमती नीता खेडकर, डॉ. अशोक चिंचोले, प्राचार्य, गोपाळ कुलकर्णी, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी ,उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात कर्मयोगी संत गाडगेबाबा व शिक्षण महर्षी सि.ना अलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले. मान्यवरांच्या स्वागतानंतर सिने अभिनेत्री सिमरन खेडकर यांचे प्रकट मुलाखत घेण्यात आले. डॉ.अनिता मुदकन्ना व डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी मुलाखत घेतले. सिमरन खेडकर यांनी मुलाखतीला उत्तर देताना अभ्यासपूर्ण विचार मांडून संपूर्ण श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोप करताना रामचंद्र दादा म्हणाले की, जीवनात स्थिर होण्यासाठी एकच मार्ग निवडणे आवश्यक असते .ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यास जीवनात आपण यशस्वी होऊ शकतो. आजचा युवक नेटच्या जाळ्यात अडकलेला आहे. कृत्रिम मशीन मध्ये जिथे गंध नाही, सुगंध नाही ,रस नाही अशावेळी पालकांनी पाल्यांना हाताळणे गरजेचे आहे. वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त काव्यवाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,मेहंदी स्पर्धा पारंपारिक वेशभूषा स्पर्धा ,क्रीडा स्पर्धा , शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. अहवाल वाचन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी यांनी केले. आभार डॉ. प्रसन्न कंदले यांनी मानले. डॉ.सोमशंकर राजमाने, डॉ.उमाकांत सलगर, डॉ. सूर्यकांत आगलावे ,डॉ. राजशेखर नळगे ,डॉ. वीरभद्रेश्वर स्वामी, संतोष चौधरी , दिलीप चव्हाण , नामदेव काळे ,बसवंत बागडे,गणेश सर्जे, महादेव काकडे ,अमित आलुरे ,शुभांगी स्वामी यांचे सहकार्य लाभले .या कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक, पालक ,पत्रकार, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.