मुरुम / प्रतिनिधी :-(सुधीर पंचगल्ले)
जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथील महात्मा गांधी विद्यालय, रावणकोळा व संदीप वाघमारे यांच्या वतीने गावातील विविध क्षेत्रांत निवड झालेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
सन्मानाचा सोहळा – मान्यवरांची उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष संग्रामजी वाघमारे, प्रमुख पाहुणे तहसीलदार राजेशजी लांडगे, गटविकास अधिकारी नरेंद्रजी मेडेवार व अरुणाताई सूर्यवंशी, सरपंच सत्यवान दळवे पाटील, भाजप तालुका अध्यक्ष सत्यवानजी पांडे, माजी सरपंच मंगेशजी हुंडेकर, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष धनराज दळवे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सोरगेकर एस.एम., मनोज जाधव व कृष्णराज वाघमारे उपस्थित होते.
नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार
गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या पालकांसह जाहीर सन्मान करण्यात आला. सन्मानित व्यक्ती – रमिज सय्यद, लिपिक यशवंत सूर्यवंशी एस आर पी एफ , ऋषिकेश वाघमारे मुंबई पोलीस, राम वाघमारे आरोग्य सहाय्यक, सूर्यकला वाघमारे मुंबई पोलीस, सूर्यकांत वाघमारे राज्य परिवहन महामंडळ चालक, माजी विद्यार्थी व माजी कर्मचारी यांचा पण यावेळी सत्कार करण्यात आला प्रवीण वाघमारे महावितरण, उद्धव वाघमारे राज्य परिवहन महामंडळ, शिवराज जमदरे सहशिक्षक जिल्हा परिषद,
संघर्ष, जिद्द आणि यशाच्या कथा
नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी संघर्ष व यशाच्या आठवणी सांगून तरुणांना कठोर परिश्रम, सातत्य व जिद्दीचे महत्त्व पटवले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले.
विद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व्ही.आर. सूर्यवंशी यांनी केले व शंकरा डिजिटल फोटो स्टुडिओ यांनी सुंदर असा छायाचित्र केले. या भव्य सत्कार सोहळ्यामुळे रावणकोळा नगरीतील तरुणांना नवी प्रेरणा मिळाली, तसेच विद्यालयाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यशाचा नवा प्रवास – नव्या ऊर्जा, नव्या दिशा
हा सोहळा केवळ सन्मानापुरता मर्यादित न राहता, तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरित करणारा ठरला. संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सामान्य परिस्थितीतील विद्यार्थीही उच्च पदांवर पोहोचू शकतात, याचा प्रत्यय उपस्थितांना या सोहळ्यातून आला.
रावणकोळा नगरीतील युवकांमध्ये नव्या ऊर्जेचा संचार झाला असून, हा सत्कार सोहळा यशस्वी भविष्यासाठी नव्या दिशेची वाट दाखवणारा ठरला.