जळकोट / प्रतिनिधी :- ( विजय पिसे )
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथून जवळ असलेल्या मूर्टा गावामध्ये राजमुद्रा प्रतिष्ठान सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यात 50 रक्तपेटी जमा झाली. यावेळी शिवजयंती निमित्त ह.भ.प. अरुंधती ताई गवळी यांच्या कीर्तनाचे ही आयोजन करण्यात आले होते. व तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूर्टा यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात सोनम कदम व वर्षा भुरे यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम अति उत्साहा मध्ये पार पाडला .व राजमुद्रा प्रतिष्ठान तर्फे व सर्व गावकऱ्यांतर्फे कलाकारांचे आभार मानले. हा कार्यक्रम अतिशय आनंदीमय वातावरणामध्ये संपन्न झाला.