spot_img
33.7 C
New York
Tuesday, July 29, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जळकोटवाडीत शिवाजी महाराज जयंती

जळकोट / प्रतिनिधी :- दि.१९(मेघराज किलजे):
येथून जवळच असलेल्या जि. प. प्रा. शाळा जळकोटवाडी (नळ) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी महाराज यांचे महान कार्य आणि शिवरायांचे विचार याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री उमेश भोसले यांनी आपले विचार मांडले. शाळेचे सहशिक्षक श्री. अशोक राठोड यांनी छत्रपती शिवराय यांच्या चरित्राबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
जयंतीनिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यानी विविध वेशभूषा धारण केली होती. विद्यार्थ्यानी ही आपली मनोगते व्यक्त केली.विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दाखविण्यात आला. शिवजयंतीच्या निमित्ताने शाळेमध्ये रांगोळी ,वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी सरपंच श्री. शिवाजी कदम , पिण्टु जाधव , शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष नागनाथ साळुंके ,नागनाथ पवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भरत सोमवंशी , सार्वजनिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष मनोज लष्करे ,बापु लष्करे , धनंजय कदम, जनक कदम ,संदीप गुळवे , सागर लष्करे , सुधीर लष्करे , शाळेतील बालचमू व अनेक शिवप्रेमी मोठ्या उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या