उमरगा /प्रतिनिधी (ज्ञानेश्वर गुरव )
उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथे श्री शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
या शिवजन्म सोहळ्यास दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता श्री च्या मूर्तीची भव्य रॅली, सकाळी नऊ वाजता श्री च्या मूर्तीस स्थापना करून अभिषेक करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास धाराशिव चे खासदार ओम राजे निंबाळकर, शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, विलास भगत, या मान्यवरांची उपस्थिती असणार आहे, सकाळी 10वाजता विद्यार्थ्यांसाठी भाषण, व इतर कार्यक्रम, तसेच सायंकाळी सहा वाजता सर्व गावकऱ्यांसाठी संभाजी माने यांच्यावतीने महाप्रसादाचे केले आहे, तसेच रात्री नऊ वाजता शिवशाहीर रामभाऊ पाचंगे उमरगेकर यांचा शिव गीतांचा व पोवाडे कार्यक्रम होणार आहे.
तसेच दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता श्री चे पूजन या कार्यक्रमासाठी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी गुरुजी, भाजप युवा नेते शरण पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव,उ बा ठा जिल्हा संघटक दीपक जवळगे, अण्णाराव माने, या मान्यवरांचे उपस्थिती असणार आहे.
तसेच दिनांक 20 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोसोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिराचे उद्घाटन उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी गुरुजी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, आणि सायंकाळी 5 वाजता काढण्यात येणार आहे,
अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष गुलचंद मातोळे यांनी दिली आहे.