इटकळ / प्रतिनिधी :- (दिनेश सलगरे):-
तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथे बुधवार दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव असल्याने शिवभक्त मुरलीधर शिनगारे यांच्या निवासस्थानी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधियुक्त पूजन व दुग्धाभिषेक करून शिव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.गेल्या पाच वर्षापासून शिवभक्त मुरलीधर शिनगारे यांच्या निवासस्थानी विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेऊन शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.याही वर्षी शिव जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी १० ते ४ या वेळेत करण्यात आलेले आहे.तरी या रक्तदान शिबिरात गाव परिसरातील युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शिवभक्त मुरलीधर शिनगारे यांनी केले आहे.