-
जळकोट / प्रतिनिधी :- दि.१५(मेघराज किलजे):
येथून जवळच असलेल्या जळकोटवाडी (नळ)येथे सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथमत: महान मानवतावादी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . संत सेवालाल महाराज यांच्या कार्याविषयी शाळेचे मुख्याध्यापक श्री. उमेश भोसले यांनी विचार मांडले. शाळेचे सहशिक्षक श्री अशोक राठोड यांनी संत सेवालाल महाराज यांच्या चरित्राविषयी व त्यांनी दिलेली शिकवण , मूल्ये आचरणात कशी आणावी. याबद्दल माहिती सांगितली. शाळेतील विद्यार्थ्यानी विविध वेशभूषा धारण केली होती .विद्यार्थ्यांना सेवालाल महाराज यांच्या जीवनांवर आधारित चित्रपट दाखविण्यात आला.याप्रसंगी सरपंच शिवाजी कदम , पोलीस पाटील श्री देविदास चव्हाण , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भरत सोमवंशी , श्री. गुलाब राठोड , सुधीर लष्करे व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
- Advertisement -