तुळजापूर / प्रतिनिधी :-
शिक्षण प्रसारक मंडळ अणदुर संचालित, श्री बाळेश्वर विद्यालय, बारूळ येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती आणि संस्थेचे शिल्पकार शिक्षण महर्षी कै. सि.ना. आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक मंगेश अणदूरकर सर, गावातील ज्येष्ठ नागरिक बाबुराव (अप्पा) ठोंबरे, माजी प्राचार्य सुरेश ठोंबरे सर, पालक सुनील ठोंबरे व शिवमूर्ती बोने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक श्री विठ्ठल नाईक सर यांनी केले.त्यानंतर 10 वी च्या विद्यार्थ्यानी आपल्या भावना व्यक्त करताना गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला.यामध्ये कु.श्रीदेवी लोखंडे, रेणुका वट्टे व सलोनी ठोंबरे यांनी भावना व्यक्त केल्या.यानंतर जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य सुरेश ठोंबरे सर, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक हजारे सर , पालक प्रतिनिधी शिवमुर्ती बोने भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक प्रगतीच्या शुभेच्या दिल्या.
अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक श्री अणदूरकर सर यांनी जीवनात आत्मविश्वास किती महत्त्वाचा आहे व परीक्षा काळात अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री हजारे सर आणि आभार श्री बलसूरकर सर यांनी केले.
याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री लाखाडे सर,लिपिक राहुल व्हरटे, सेवक जयाभाऊ वट्टे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे शेवटी वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता.