बिग बॉसमधून बाहेर पडल्यापासून कोकण हार्टेड गर्ल खूप चर्चेत आहे. बिग बॉसनंतर अंकिताची लोकप्रियता आणखी वाढली असून तिचा चाहतावर्गही मोठा झालाय. अंकिता वालावलकरची लग्नघाई सुरू आहे. बिग बॉस मधून बाहेर आल्यावर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाचे अपडेट देत असते. तिच्या लग्नाची धूमधाम सुरू असून तिचा लग्न कधी होणार? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. आता तिच्या लग्नाचं शेड्यूल आलं आहे. यामध्ये तिच्या लग्नाचे फंक्शन कोणत्या तारखेला होणार आहेत? हे समोर आलंय.
अंकिता लवकरच लग्न करणार आहे हे सर्वांनाच माहीत आहे मात्र कधी? हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. आता तिच्या लग्नाचं शेड्यूल समोर आलंय. तिच्या लग्नाच्या फंक्शन्सला उद्यापासून सुरुवात होत आहे.
कृष्णराज महाडिकसोबत जोडलं नाव, रिंकू राजगुरूच्या कुटुंबियांनी एका वाक्यात संपवला विषय
अंकिता वालावलकरच्या लग्नाचं शेड्यूल
13 फेब्रुवारीला अंकिताला मेहंदी लागणार आहे.
त्यानंतर 14 फेब्रुवारीला तिचा साखरपुडा पार पडेल.
दरम्यान, अंकिता वालावलकर कुणाल भगतसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र अखेर आता त्यांची लग्नाचं शेड्यूल समोर आलं. अंकिताचा होणारा नवरा कुणाल हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे. कुणाल हा देखील कोकणातील माणगाव येथील आहे.