spot_img
10.2 C
New York
Tuesday, November 4, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसमोर मलायका अरोराचा जलवा, केला जबरदस्त डान्स;

अभिनेता अर्जुन कपूर जितका त्याच्या कामामुळे चर्चेत असतो, तितकाच तो वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. गेल्या वर्षी अर्जुनने मलायका अरोराशी ब्रेकअप झाल्याचं जाहीर करत आता सिंगल असल्याचं सांगितलं. पण, नुकत्याच एका कार्यक्रमात दोघं आमने-सामने आले. यावेळी मलायकाचा जबरदस्त डान्स पाहून अर्जुन कपूरने तिचं भरभरून कौतुक केलं.

सध्या अर्जुन कपूर त्याचा आगामी चित्रपट ‘मेरे हसबंड की बीवी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अर्जुनसह अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. २१ फेब्रुवारीला ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अर्जुन, भूमी आणि रकुल ठिकठिकाणी प्रमोशन करताना पाहायला मिळत आहेत. ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने अर्जुनने ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेज सुपर डान्सर चॅम्पियन टशन’च्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली होती. या फिनालेमध्ये मलायकाने आपल्या लोकप्रिय गाण्यांवर जबरदस्त डान्स केला. हे पाहून अर्जुनने स्टँडिंग ओव्हशन दिलं.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या