जळकोट जिप निवडणुकीतील पराभवानंतरही प्रकाश चव्हाण यांचा ग्रामविकासाचा निर्धार कायम
——————————
धाराशिव ( सतिश राठोड ) :-
जळकोट जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत पराभव झाला असला तरी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने मतदारसंघात काम करण्याचा निर्धार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
मतदारांचे आभार मानण्यासाठी तसेच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी जळकोट मतदारसंघातील हागलूर, मानेवाडीसह अन्य गावांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे.यावेळी बोलताना प्रकाश चव्हाण म्हणाले की, “निवडणुकीत विजय-पराजय हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. मतदारांनी दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. मात्र विकासकामांचा वेग कमी होणार नाही. आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे युवा नेते सुनील मालक चव्हाण आणि मल्हार दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळकोट गटातील गाव, वाड्या-वस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही अधिक जोमाने काम करू.”
जळकोट जिल्हा परिषद गटात भाजपा महायुतीकडून ज्योतीताई प्रकाश चव्हाण यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र पराभवाला खचून न जाता ज्योतीताईंनीही गावभेटी देत मतदारराजाचे आभार मानले. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी विविध विकासकामांबाबत चर्चा केली. प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचा आमचा प्रयत्न राहील. असे यावेळी प्रकाश चव्हाण यानी बोलताना केले गावभेटीदरम्यान ग्रामस्थांनीही विविध समस्या मांडत विकासकामांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. आगामी काळात जळकोट गटाच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास प्रकाश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी कृषी बाजार समितीचे अशोक पाटील, सुनील खटके, मनोहर माने, आप्पा गडदे, महादेव माने, नितीन पाटील, संतोष नागरगोजे, अंकुश घुगे, नालंदा पाटील, संजय राठोड, हणमंत घुगे यांच्या सह महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




