spot_img
-1.3 C
New York
Tuesday, February 10, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

पुणे–सोलापूर महामार्गावर एसटी चालकावर प्राणघातक हल्ला; चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

पुणे–सोलापूर महामार्गावर एसटी चालकावर प्राणघातक हल्ला; चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

सोलापूर, दि.१० फेब्रुवारी

पुणे–सोलापूर महामार्गावरील रावणगाव (ता. दौंड) परिसरात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. एसटी बसला कार आडवी लावून कारमधील चार ते पाच जणांनी एसटी चालकाला जबरदस्तीने खाली ओढत बेदम मारहाण केली. या घटनेत सोलापूर आगारातील एसटी चालक अतुल भोसले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेनंतर जखमी अवस्थेत असलेल्या चालकाला एसटीतील प्रवाशांनी तत्काळ मदत केली. रुग्णवाहिका बोलावून त्यांना दौंड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीमुळे भोसले काही काळ बेशुद्ध अवस्थेत होते. मंगळवारी शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

या संपूर्ण प्रकाराला एका प्रवाशाने काढलेल्या व्हिडिओमुळे वाचा फुटली. संबंधित प्रवाशाने हा व्हिडिओ चालकाच्या मोबाईलवर पाठवला होता. शुद्धीवर आल्यानंतर चालकाने हा व्हिडिओ राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व सहकाऱ्यांना पाठवला. घटनेची माहिती मिळताच सोलापूर आगार प्रमुखांनी दौंड येथे धाव घेऊन रावणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानुसार कार क्रमांक एमएच ४२ बी.एन ७७९८ मधील चार ते पाच अज्ञात व्यक्तींविरोधात रावणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके नेमली आहेत.

दरम्यान, या घटनेचा निषेध करत एसटी कर्मचारी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या