माकणी जि. प. गटात भाजपाची प्रचारसभा
जळकोट (मेघराज किलजे) :-
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने माकणी जिल्हा परिषद गटातील व गणातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचाराची शेवटच्या दिवसाची सांगता जाहीर सभेत माकणी गटासह धाराशिव जिल्ह्याचा कायापालट केलेल्या विकास कामाबरोबर व या गटासाठी व जिल्ह्यातील हाती घेतलेल्या विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती देत माकणी जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार सौ. शितलताई राहुल पाटील व धानुरी गणातील भाजपा अधिकृत उमेदवार नागनाथ पाटील व माकणी गणातील भाजपा पुरस्कृत उमेदवार सौ. लतिका घोडके या सर्व भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी
केले.तसेच माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी गावातील व मतदार संघातील पायाभूत सुविधा व स्थानिक प्रश्न तसेच रस्ते आरोग्य शिक्षण शेतकऱ्यांसाठी शेती चालना नियोजनबद्ध व पारदर्शक कामकाज मार्गी लावण्यासाठी आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून माकणी गावासह मतदार संघाचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही पूर्ण कटिबद्ध आहोत. असे सांगितले.
आ .पाटील व भाजपा नेते बसवराज पाटील यांनी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीचे आपके सरकार असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आपल्या भाजपा व महायुतीची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व विकासकामांना आणखी गती मिळणार आहे. नव्या प्रकल्पांच्या मंजुरी आणि निधी उपलब्धतेलाही वेग येईल. सर्वांच्या सहकार्याने सुरू केलेला विकासकामांचा हा अश्वमेघ रथ पुढे नेण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. पालिका आणि महापालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे महायुतीला निर्विवाद विजय मिळाला अगदी त्याप्रमाणेच माकणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही कुठल्याही भूलथापाला बळी न पडता मतदानाच्या दिवशी सक्षम, नेतृत्व तसेच उच्चशिक्षित अनुभवी व विकासकामाची जाण असणारे भाजपचे उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. असे या जाहीर सभेतून माकणी येथील गट व गणांतील सुज्ञ मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी ऍड. विश्वनाथ पत्रिके हे होते. यावेळी व्यासपीठावर लातूर भाजपा जिल्हा शहराध्यक्ष अजित कव्हेकर ,उमरगा-लोहारा भाजपा विधानसभा प्रमुख राहुल पाटील यांच्यासह माजी जि. प. सदस्य गोविंद पवार, दिलीप भालेराव, भाजपा युवा मोर्चा माजी तालुका अध्यक्ष शुभम साठे, प्रभूलिंग बरटे,विकासो माजी चेअरमन सुनील जाधव,प्रकाश घोडके,भाजपा माजी तालुकाधक्ष्य प्रमोद पोतदार, भाजपाचे राजेंद्र पाटील ,श्रीहरी यादव,ग्रा. प. सदस्य दीपक आळंगे,निकेत पत्रिके,कृउबा समिती लोहारा सभापती दयानंद गिरी, ब्रह्मानंद पाटील,दिलीप पवार माजी ता.सरचिटणीस दगडू तिगाडे, सरचिटणीस निकेश बचाटे,सचिन सूर्यवंशी, सिद्धेश्वर बिडवे आदि उपस्थित होते.
यावेळी या सभेस गावातील व मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक ,स्थानिक मतदार, महिला, शेतकरी, युवक,नागरिक, विविध समिती व सामाजिक संघटनेचे, मित्रमंडळ, पदाधिकारी, भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.




