विकास हाच आजेंडा – बोंगरगे यांची दमदार एंट्री
—————————-
तुळजापूर ( सतिश राठोड ) :- खुदावाडी पस गणाचे अपक्ष उमेदवार तुकाराम बोंगरगे यांनी भव्य आणि शिस्तबद्ध प्रचार फेरी काढत निवडणूक रणधुमाळीला वेग दिला. “विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांचा सहभाग” या त्रिसूत्रीवर आधारित प्रचारामुळे बोंगरगे यांची एंट्री विशेष चर्चेचा विषय ठरला.
प्रचार फेरीदरम्यान खुदावाडीतील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी बोंगरगे यांचे स्वागत केले. हालग्याचा गजर घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी बोलताना उमेदवार तुकाराम बोंगरगे म्हणाले,“खुदावाडी आणि खुदावाडी पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास हाच माझा ठाम संकल्प आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांवर भर देत जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. अपक्ष म्हणून कोणत्याही राजकीय दबावाशिवाय फक्त जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातील.”स्थानिक नागरिकांनीही बोंगरगे यांच्या साधेपणा, कामाची तळमळ आणि थेट जनतेशी संवाद साधण्याच्या भूमिकेचे कौतुक केले. “नेहमी लोकांमध्ये राहणारा आणि प्रश्न ऐकून घेणारा उमेदवार म्हणून बोंगरगे यांच्याकडे आम्ही आशेने पाहत आहोत,” अशी प्रतिक्रिया अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.
प्रचार फेरीत तरुण, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग दिसून आला. यामुळे बोंगरगे यांच्या उमेदवारीला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येते.
एकूणच, विकासाचा ठाम संकल्प आणि दमदार एंट्री यामुळे खुदावाडी पस गणाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार तुकाराम बोंगरगे हे एक मजबूत आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे दिसून येत.




