spot_img
0.4 C
New York
Wednesday, February 4, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

नंदगाव जि.प. गट- शिवसेना (उबाठा )गटाचे उमेदवार सूर्यकांत आरबळे यांचा गृहभेटींद्वारे प्रचार

नंदगाव जि.प. गट- शिवसेना (उबाठा )गटाचे उमेदवार सूर्यकांत आरबळे यांचा गृहभेटींद्वारे प्रचार
—————
धाराशिव ( सतिश राठोड ) :-

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जि.प. गटात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार सूर्यकांत आरबळे यांच्या प्रचाराला नंदगाव येथून सुरुवात करण्यात आली आहे.
प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात गृहभेटींच्या माध्यमातून गावोगावी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधण्यात येत असून प्रचाराचा सपाटा वेगाने सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेस आय आणि शिवसेना (उबाठा) गटाची अधिकृत युती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्रितपणे प्रचारात उतरले असून मतदारांना आपलेसे करण्यावर विशेष भर दिला जात आहे. विकासकामे, स्थानिक प्रश्न, शेतकरी, युवक आणि महिलांच्या समस्या याबाबत उमेदवार सूर्यकांत आरबळे मतदारांशी सविस्तर चर्चा करत आहेत.गृहभेटी दरम्यान नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून “नंदगाव जि.प. गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे,” असा विश्वास उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे. कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत, आघाडीच्या धोरणांची माहिती देत आहेत.दरम्यान, विरोधी गटातील उमेदवारांनीही प्रचाराला सुरुवात केली असून नंदगाव जि.प. गटातील निवडणूक लढत दिवसेंदिवस अधिक चुरशीची होत चालली आहे. येत्या काळात प्रचाराला आणखी वेग येणार असून नंदगाव गटाचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या