spot_img
0.4 C
New York
Wednesday, February 4, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

जळकोट गटात परिवर्तनाची हाक- भाजपाच्या ज्योतीताई प्रकाश चव्हाण यांच्या प्रचार मोहिमेचा दमदार प्रारंभ

जळकोट गटात परिवर्तनाची हाक- भाजपाच्या ज्योतीताई प्रकाश चव्हाण यांच्या प्रचार मोहिमेचा दमदार प्रारंभ
—————-
धाराशिव (सतिश राठोड ) :-

तुळजापूर तालुक्यातील जळकोट जिल्हा परिषद गटाच्या भाजपाचे अधिकृत उमेदवार ज्योतीताई प्रकाश चव्हाण यांचा मानेवाडी येथिल ग्रामदैवत हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचार मोहीमेचा दमदार प्रारंभ करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामदैवताचे दर्शन घेऊन विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना भाजपा उमेदवार ज्योतीताई प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, “आमदार राणाजगजितसिंह पाटील व युवा नेते सुनिल मालक चव्हाण यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे.” पुढे त्या म्हणाल्या की, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, शेतकरी, युवक तसेच मूलभूत सुविधा यासाठी भाजपाने नेहमीच ठोस काम केले असून, जिल्हा परिषदेमध्ये भाजपाला बळ मिळाल्यास विकासाला गती मिळेल.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही ज्योतीताई चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केले.तर मतदार संघातील हागलुर येथील गावास उमेदवार ज्योतीताई प्रकाश चव्हाण व होर्टी पंचायत समिती गणाचे भाजपाचे उमेदवार सुकेशनी संजय मोठे यानी सदिच्छा भेट दिली असता येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदीत महाआरती करून दर्शन घेतल्या. व येथील ग्रामस्थांशी संवाद साधल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश दादा सोनटक्के, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश चव्हाण, दत्ता राजमाने, अतुल भोसले, सुधाकर गायकवाड, संजय मोटे,सुनील खटके,मनोहर माने, आप्पा गडदे, महादेव माने, लक्ष्मण गायकवाड,लखन मोटे, शाहुराज गायकवाड, सुर्यकांत राठोड, यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते
ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या