नंदगाव जि.प. गट – महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ
——————-
धाराशिव ( सतिश राठोड ) :- तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जि.प. गटातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ खुदावाडी येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून उत्साहात करण्यात आला.
नंदगाव जि.प. गटासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अधिकृत उमेदवार सूर्यकांत आरबळे तसेच पंचायत समिती खुदावाडी गणासाठी काँग्रेस (आय) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय राठोड हे निवडणूक आखाड्यात उतरले आहेत यांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला.
यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र दादा आलुरे, शिवसेना उबाठा गटाचे युवा सेनेचे नेते रुषिकेश भैय्या मगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक हरीश जाधव, काटे गुरुजी, गंगा चिंचोले, डिगंबर कबाडे, ग्रामपंचायत सदस्य सावंत पवार, हरी पवार याची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी खुदावाडी, नंदगाव, दहिटणा गुजनूर, वागदरी, रामतिर्थ आदी परिसरातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहून प्रचाराला पाठिंबा दर्शविला.
यावेळी बोलताना शिवसेना (उबाठा) गटाचे नंदगाव जि.प. गटाचे अधिकृत उमेदवार सूर्यकांत आरबळे यांनी सत्ताधारी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी ग्रामीण भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असून शेतकरी, शेतमजूर, युवक आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले असून जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
कार्यकर्त्यांमध्ये या प्रचार शुभारंभामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात प्रचार अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
नंदगाव जि.प. गट – महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ
- Advertisement -




