spot_img
0.4 C
New York
Wednesday, February 4, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

चिंकुद्रा येथे ऊसतोड महिलांसाठी हळदी-कुंकवाचा आगळा उपक्रम

चिंकुद्रा येथे ऊसतोड महिलांसाठी हळदी-कुंकवाचा आगळा उपक्रम
——————
नळदुर्ग / प्रतिनिधी (सतिश राठोड ) :-

चिंकुद्रा ता. तुळजापूर येथे सिआरपी केशरताई जाधव यांच्या पुढाकारातून एक सामाजिक जाणीव जपणारा आणि माणुसकीचा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. गावातील महिलांना एकत्रित करत गावाच्या बाहेर पालावर वास्तव्यास असलेल्या व ऊसाच्या फडात ऊसतोड करणाऱ्या ऊसतोड महिलांसोबत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सण-उत्सवांपासून कायम दूर राहणाऱ्या या महिलांना या कार्यक्रमामुळे आनंदाचा क्षण अनुभवता आला. रोजच्या कष्टमय जीवनात रमलेल्या या महिलांच्या चेहऱ्यावर हसरे भाव दिसत होते. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधण्यात आला, आपुलकीने विचारपूस करण्यात आली तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा ऊसाच्या फडातच सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे ऊसतोड महिलांना सामाजिक स्वीकार आणि माणुसकीची ऊब मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सिआरपी केशरताई जाधव यांनी सांगितले की, समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आनंद पोहोचवणे हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट होते. अशा कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो व समाजात समानतेची भावना रुजते. किरण बेदी ग्राम संघातील चिकुंद्रा येथील महिला उपस्थित होत्या.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या