spot_img
0.4 C
New York
Wednesday, February 4, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग गणेशखिळा येथे श्री गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन हभप बाल कीर्तनकार समर्थ महाराज यांची कीर्तन सेवा

नळदुर्ग गणेशखिळा येथे श्री गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

हभप बाल कीर्तनकार समर्थ महाराज यांची कीर्तन सेवा
————————–
नळदुर्ग (सतीश राठोड) :-

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग–अक्कलकोट रोडवरील गणेशखिळा येथील प्राचीन श्री गणपती मंदिरात श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात 22 रोजी साजरा करण्यात येणार आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणून ह.भ.प. बाल कीर्तनकार समर्थ महाराज (वारकरी संस्था, कानेगाव) यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. समर्थ महाराज आपल्या प्रभावी व ओघवत्या शैलीतून भगवान श्री गणेशाचे महात्म्य, भक्तीचा मार्ग आणि वारकरी संप्रदायाचे विचार भक्तांपर्यंत पोहोचवणार आहेत. श्री गणेश जयंतीनिमित्त सकाळी धार्मिक विधी, अभिषेक व आरतीचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर कीर्तन सेवा पार पडणार आहे. कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नळदुर्ग नगरपरिषदेच्या नगरसेविका श्रीमती सुमन काकी ठाकूर यांनी भाविकांना आवाहन करत सांगितले की, “श्री गणेश जयंतीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सेवेचा व महाप्रसादाचा लाभ जास्तीत जास्त गणेश भक्तांनी घ्यावा असे आवाहन केले आहेत.

- Advertisement -

Related Articles

ताज्या बातम्या