खुदावाडी प.स. निवडणुकीसाठी सावंत पवार यांचा काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल
———————
खुदावाडी (सतिश राठोड ) :- पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून खुदावाडी गणातून सावंत पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील निवडणूक रंगतदार आणि अटीतटीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. सावंत पवार हे काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सावंत पवार हे खुदावाडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व बाबुराव भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गाव पातळीवर विविध विकासात्मक उपक्रम राबवले असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सामाजिक सुविधा आदी कामांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सध्या ते खुदावाडी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असून, ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतल्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.
खुदावाडी प.स. निवडणुकीसाठी सावंत पवार यांचा काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल
- Advertisement -




